शुभम लूटे
वैजापूर, (प्रतिनिधी) : तब्बल २ वर्षापासून तालुक्यातील जनता नगरपालिका निवडणूक कधी होणार याची चातका सारखी वाट पाहत होती अखेर निवडणूक आयोगाने मंगळवारी याची घोषणा केली आणि थंडीत राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली.
प्रत्येक वार्ड आणि प्रभागात भावी नगरसेवकचे दिव्य स्वप्न कार्यकर्त्यांना पडायला लागली आहेत. प्रत्येक वार्डात पाच ते सहा तुल्यबल इच्छुक उमेदवार आहे. त्यामुळे भावी नगरसेवकांमुळे उमेदवारी देताना महायुती व महाविका स आघाडी यांच्या नाकी नऊ येणार हे नक्की. सोशल मीडिया वर तर नगरसेवक फिक्स पण झाले, पण जनता कोणाच्या अंगावर गुलाल टाकते याचा निर्णय ३ डिसेंबरला समजणार आहे. राज्यात सध्या महायुती तसेच महा विकास आघाडी आहे. पण वैजापूरमध्ये सध्या महायुतीमध्ये नगराध्यक्ष पण आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूनी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. २० वर्षपासून वैजापूर नगरपालिका वर भाजपचे ड्रॉ दिनेश परदेशी यांची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या एक हाती वर्चस्वला सुरुंग लावायचे काम आमदार रमेश बोरनारे यांनी हाती घेतले आहे.
पक्षाचा मेळावा असो, किंवा कुठे विकास कामाचा शुभारंभ ते एकही संधी परदेशीवर टीका करण्याची सोडत नाही. परंतु परदेशींनी अजून पर्यंत आमदार बोरनारे यांच्या टीकेला उत्तर दिलेले नाही. त्यामुळेही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे, ना वैजापूर चे नगराध्यक्षपद सध्या ओबीसी पुरुष व महिला यांच्या साठी राखीव झाले आहे. त्यामुळे भाजपकडून ड्रॉ दिनेश परदेशी शिंदे
गटाकडून आमदार बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे ड्रॉ राजीव डोंगरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये ड्रॉ राजीव डोंगरे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळते. का हे पाहणे उत्सुकांचे ठरणार आहे. कारण शेतकरी पाणी परिषद मग भाजप मग उबाठा आणि शेवटी शिंदे गट असा प्रवास त्यांनी केला आहे. मागील वेळेस त्यांना नशिबाने साथ दिली नाही. या वेळेस तरी त्यांची लॉटरी लागते का हे येणारा काळचं ठरवरणार आहे.
गेल्या विधानसभाला परदेशी यांनी शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश करत आमदार बोरनारे यांच्या विरोधात निवडणूक लडवली होती. ९१ हजाराच्या आसपास मते घेतली होती. त्याची सल आमदार बोरनारे यांच्या मनात अजून कायम आहे. आहे. त्यामुळे यंदा नगरपालिका निवडणुकीत परदेशी यांना धक्का देऊन नगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायची च असा चंग त्यानी बांधला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात तर त्यानी ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष अशी मागणी केली होती. नगराध्यक्ष पद युती मध्ये कोणाला ही सुटो सहकारी पक्ष युती धर्म मनापासून पाळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे वैजापूर नगरपालिका निवडणूक अतिशय अटी तटीची होणार हे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणूकीच्या वेळेला विकास कामावर कमी आणि मराठा विरुद्ध ओबीसी व हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी लढत बगायला मिळाली होती. त्यामुळे नगरपालिका निवडणूक सुद्धा याचं मुद्द्यावर होणार अशी चर्चा नागरिकांत बागावयास मिळत आहे.
त्यामुळे एका विशिष्ट समाजाचे मत कोणाच्या पारड्यात पडते याची उत्सुकता लागलेली आहे. हाजी अकील शेख यांचे नगराध्यक्ष पदाचे स्वप्न जरी भंग झाले असले तरी ते आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतात यावर सुद्धा वैजापूर वासियांचे लक्ष लागून आहे. कारण वैजापूर शहरामध्ये मुस्लिम मतदार सुद्धा बहुसंख्य आहे, याची प्रचिती मागील निवडणुकीला आली आहे.















